![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKRT11-pbdMfII9F8SSzUwqlEBOwD1B0ECPG4Ej2ZdzBm52nJc6BmVsAfdSxRCKBvsdTvBZuQuZbwIgIZNq-Yjf-DGScRLtj0GDcQfuOkgYImyekROz-GPbGWKvt7nJSVaT_u2v3np6wCV/s320/milind+36.jpg)
व्हॅलेंटाईन डे...तमाम प्रेमीयुगुलांचा हक्काचा प्यार डे...आपल्या प्रिय व्यक्तीला कुणी प्रेमाचा गुलाब देणार तर कुणी प्रेमपत्र देणार...कुणी प्रेयसीला किस करणार तर कुणी मिस करणार...कॉलेजच्या कट्ट्यावर बसून बर्याच जणांचे प्रेमपाठ सुरु असतात. त्यात कुणी यशस्वी होतं. तर कुणी अयशस्वी. मुळात काहींचा नेहमी जिंकणं हा हेतूही नसतो. कधी-कधी जिंकण्यापेक्षा हारण्यातही त्यांना जिंकणं वाटतं. कुणावरही प्रेम करणं, हा काही अपराध नाही. आपल्या मनातल्या भावना जर आपल्या प्रिय व्यक्तीजवळ दिलखुलासपणे मांडल्या तर त्या स्वीकारणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतात. सागरकिनारी मारलेल्या मनसोक्त गप्पा, कधी हळूच गोड गुपित सांगितलेली गोष्ट, एकमेकांच्या साक्षीने घेतलेल्या आणाभाका आणि सतत हवाहवासा वाटणारा सहवास प्रत्येकानं कधीतरी अनुभवलेला असतो. प्रेम किती हार्ट टू हार्ट आहे, हे सांगण्यासाठी नदीकिनारी वाळीत नाव लिहिणं, गावच्या जत्रेत हौसेखातर हातावर नाव गोंदणं. कधी पिकनिक स्पॉटवरच्या दगडांवर तर कधी एसटीच्या बाकड्यावर तिचं नाव कोरलं जातं. इतरांच्या दृष्टीने तो वेडा असला तरी त्याला वेडेपणातच शहाणपणा वाटतो. सगळ्यांच्या प्रेम व्याख्याही जरा हटकेच. एकमेकांना मनापासून आवडणं. त्याची किंवा तिची प्रतिमा डोळ्यात साठवणं. हृदयात जागवलेली प्रीत नव्यानं जगण्याची उमेद देते. स्वप्नांचं भावविश्व अनेक रंगांनी भरलं जातं, विस्तारलं जातं. सरलेल्या दिवसातल्या उरलेल्या आठवणी मग ताज्या होतात. डायरीची पानं वार्याच्या झुळकीनं फडफडायला लागतात तशी उलगडायलाही लागतात. प्रेम हे अमूल्य आहे. प्रेमाला आंधळं म्हटलं जात असलं तरी ते डोळसपणे करायला हवं. मनातलं बोलता आलं नाही म्हणजे प्रेम नाही, असं थोडंच आहे.
प्रेमानं आपल्या जगण्याला नवा अर्थ येतो, हे मान्य आहे. आपण प्रेम करतो, हे जगाला दिसावंच अशा डे संस्कृतीचा हट्ट धरण्याची गरजच? परंतु, जर या निमित्तानं आपली प्रिय व्यक्ती सुखी राहत असेल तर हा निश्चय केला पाहिजे. तिच्या सुखदुःखात सहभागी झालात तर प्रेम सदैव पवित्र आणि अतुट राहील, यात शंका नाही.
प्रेमानं आपल्या जगण्याला नवा अर्थ येतो, हे मान्य आहे. आपण प्रेम करतो, हे जगाला दिसावंच अशा डे संस्कृतीचा हट्ट धरण्याची गरजच? परंतु, जर या निमित्तानं आपली प्रिय व्यक्ती सुखी राहत असेल तर हा निश्चय केला पाहिजे. तिच्या सुखदुःखात सहभागी झालात तर प्रेम सदैव पवित्र आणि अतुट राहील, यात शंका नाही.
No comments:
Post a Comment